Download App

मुख्यमंत्र्यांच्या सुरत दौऱ्यावरुन जयंत पाटलांनी घेतली फिरकी…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सुरतला गेले नसते तर गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर गेला, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज जयंत पाटलांनी अधिवेशात आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवरही भाष्य केलंय. जयंत पाटील आपलं मत व्यक्त करीत असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते.

जयंत पाटील म्हणाले, आमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आमच्या शेजारी बसत होते. आपण ज्या सरकारमध्ये होतो त्या सरकारने विकासकामे केली नाहीत, असं मुख्यमंत्री सांगत आहेत. आपण ज्या सरकारमध्ये होतो, त्या सरकारबद्दल असं बोलणं याचं भान मुख्यमंत्री शिंदे यांना नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानंतर मी अभ्यास करणं सुरु केलं. मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक झाली. 2020 साली 44 हजार कोटी, 2021 साली 2 लाख 77 हजार तर 22 साली 35 हजार कोटींची गुंतवणूक झाली, पण आता गुंतवणूकीच्या बाबतीत गुजरात नंबर एकचे राज्य ठरलं आहे.

Anantrao Deshmukh : फडणवीसांना हवाहवासा वाटणारा नेता भाजपात!

त्यानंतर कर्नाटक दुसऱ्या नंबरचे राज्य ठरलंय तर महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर आला आलाय. मुख्यमंत्री सुरत दौऱ्यावर गेले होते. त्यामुळेच बाहेर राज्यात प्रकल्प गेले असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री सुरतला गेले नसते तर महाराष्ट्र गुंतवणूकीच्या बाबतीत एक नंबरला असते अशी खोचक टीकाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय.

दरम्यान, विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असून नूकतंच विधीमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही जयंत पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे सरकार शेतकरी कामगारांचं नसून बिल्डरांच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us