Jayant Patil : मी राजीनामा दिला नाही. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. तसेच भाजपात (BJP) प्रवेशासाठी कुणालाही विचारलं नसल्याची माहिती माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरु होती. तसेच आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता स्वत: जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत राजीनामा दिला नसल्याची माहिती दिली आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची देखील माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
भाजपच्या मंत्र्यांना घेता येणार सव्वालाख रूपयांचा मोबाईल; अनलिमिटेड बिलाचीही मुभा…
तसेच भाजपकडून कुणीही मला प्रवेशाबद्दल विचारलं नाही. भाजपच्या प्रमुख नेत्यांशी माझे चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांची आणि माझी भेट होत असते असं देखील विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेसला मोठा धक्का, शरद पवारांसह 75 खासदार निवृत्त होणार, राजकारण तापणार