जयंत पाटील तुमच्यासोबत येणार का? अजितदादा म्हणाले, ‘आमची राजकीय भूमिका…’

जयंत पाटील तुमच्यासोबत येणार का? अजितदादा म्हणाले, ‘आमची राजकीय भूमिका…’

Ajit Pawar on Jayant Patil Resignation: शरद पवार (Sharad Pawar) यांचे खासमखास मानले जाणारे जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी काल (दि. 13 जुलै) शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री आणि एकेकाळी जयंत पाटील यांचे सहकारी अजित पवार यांनी पाटील त्यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं.

घनदाट जंगलात आढळली रशियन महिला, सोबत दोन चिमुकल्या; धक्कादायक कारण समोर 

अजित पवार आज पुणे जिल्ह्यात विविध विकासकामे आणि समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना जयंत पाटलांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या पक्षाअंतर्गत त्यांनी काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे.

आम्हा दोघांची राजकीय भूमिका वेगळी
जयंत पाटील तुमच्याबरोबर येणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, जयंत पाटील वरिष्ठ नेते आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आर.आर. पाटील असे आम्ही सर्वजण नव्वदच्या बॅचचेआहोत. आमची आता आमदारकीची आठवणी टर्म आहे. इतके वर्षे एकत्र काम केल्यामुळे आमचे संबध आहेत. पण, त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, हे जगजाहीर आहे, असं अजितदादा म्हणाले.

Bihar : मतदार यांद्यामध्ये मोठा घोळ, व्होटर लिस्टमध्ये नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारच्या नागरिकांची नावे 

ते पुढे म्हणाले, त्यांनी कोणत्या हेतून राजीनामा दिलाय, हे आपल्याला माहीत नाही आणि विचारण्याचा अधिकार नाही. ते पुढच्या आठवड्यात अधिवेशनात भेटले तर सहज त्यांना याबद्दल विचारेन. ते सहा-सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे, इतरांना संधी देऊन त्यांनी कदाचित राष्ट्रीय पातळीवर जायचं असेल.

दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांनी राजीनामा दिलाय, त्यांनाही शुभेच्छा आणि जे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, त्यांनाही शुभेच्छा. सर्वांनी चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube