Download App

Jayant Patil : शरद पवार पुन्हा ॲक्टिव, अनेकांच्या अडचणी वाढल्या

  • Written By: Last Updated:

मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षातील नेत्यांच्या आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. आता शरद पवार हे पुन्हा ॲक्टिव झाल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाल्याचा टोला जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

येत्या काळात देशासह राज्यात देखील निवडणुका होऊ घातल्या आहेत. शरद पवार हे देशातील विरोधकांना एकत्र आणणारे महत्वाचे नेते असल्याने तसेच राज्यात महाविकास आघाडीचे जनक असल्याने त्यांच्या ॲक्टिव होण्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्नाटकाच्या निकालावर बोलताना पाटील म्हणाले आगामी निवडणुकामध्ये ध्रुववीकरण होणार नाही. कर्नाटकमध्ये लोकांनी भाजपाला नाकारून काँग्रेसला निवडून दिल्याने देशात बदलाचे वारे सुरु झाले आहे. येत्या काळात देशात होणाऱ्या निवडणुकात भाजपाला 30 टक्के देखील मते पडणार नाहीत. तसेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 जागा देखील मिळणार नाहीत असे यावेळी पाटील म्हणाले.

 

Pune BJP State Executive Meeting : फडणवीसांचे ज्येष्ठांना टोले की पंकजा मुंडेंना सुनावले !

सध्या राज्यात होत असलेल्या दंगलींबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले राज्यात दंगल होणे म्हणजे सरकार चे मोठे अपयश आहे. गृहमंत्री यांनी पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा याकडे लक्ष दिले पाहिजे असा टोला पाटलांनी फडणवीसांना लगावला.

Tags

follow us