Jayant Patil in Action : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करत जनतेला एकप्रकारे सादच घातली आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी अगोदर अजित पवारांच्या शपथविधीला जाणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. तर त्यानंत आता थेट अजित पवारांसोबत पक्षाविरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदार विरोधात राष्ट्रवादीने कारवाई केली आहे. ( Jayant patil take a action for Disqualify NCP MLA who take Oath as minister with Ajit Pawar )
कथित परकीय चलन उल्लंघन प्रकरणात अनिल अंबानी ईडीसमोर हजर
कोणा-कोणावर झाली कारवाई :
अजित पवारांसोबत पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदार विरोधात राष्ट्रवादीने कारवाई केली आहे. त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाविरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांचा समावेश आहे. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.त्यासंदर्भात तसे पत्रक जयंत पाटलांनी काढले आहे.
maharshtra politics; ‘अजित पवार म्हणजे पक्ष नाही’, शरद पवारांचा थेट इशारा
दरम्यान यावर विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढलेले पक्षाविरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांविरोधात तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर लवकरच विचार करू असं यावर विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शपथविधीला जाणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई :
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या शपथविधीला जाणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये पक्षाचे सदस्यत्वावरून व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे त्याचबरोबर अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यासंदर्भात तसे पत्रक काढले आहे.