Download App

सरकारला महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणंघेणं नाही, म्हणूनच ते राज्याबाहेर फिरतायेत; जयंत पाटलांची टीका

  • Written By: Last Updated:

राज्यात गरज असताना संपूर्ण सरकार राज्याच्या बाहेर फिरते आहे कारण त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, अनेक ठिकाणी गारा कोसळल्या आहेत पण राज्यातील सर्व मंत्री अयोध्येत होते. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या दुर्घटना कडे राज्य सरकारच्या मनात कोणतीही सहानभूती नाही. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होतो आहे, सरकारच त्याच्या कडे लक्ष नाही. त्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही.”

राजकारण कसं असतं? पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने सांगितलं…

याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, “याउलट शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसले आहे. राज्यात पहिल्यांदा असा प्रकार झाला आहे, ज्यात संपूर्ण सरकार देवाच्या दर्शनाला गेलं आहे. त्यामुळे राज्यात गरज असताना संपूर्ण सरकार राज्याच्या बाहेर फिरते आहे कारण त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही.”

जेपीसीवरून वेगळे अर्थ काढले जाऊ नयेत

जेपीसी मध्ये नेहमीच सत्ताधारी पक्षाची संख्या जास्त असते, त्यामुळे निर्णय त्यांच्या बाजूनेच येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोर्टाच्या देखरेखीखालीच अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यातून वेगळे अर्थ काढले जाऊ नयेत, अशी सारवासारव देखील जयंत पाटील यांच्याकडून करण्यात अली आहे.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

पंतप्रधान मोदींच्या पदवीवरून स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यावर देखील जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.  त्यावर बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी किती शिकलेत यावरून ते पंतप्रधान नाहीत. पण त्यांनी जर एकदा सांगितलं की मी इतकं शिकलो आहे. तर त्याची चिकित्सा होणार. आपल्याकडे सार्वजनिक आयुष्यात आल्यानंतर हे होत असतं. जोपर्यंत ते यावर स्पष्टीकरण देत नाहीत. तोपर्यंत हे वाद होत राहणार.” असं यावर जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us