Download App

जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला “ सुप्रिया सुळे असं का? म्हणाल्या…

  • Written By: Last Updated:

नुकतीच सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाली या निवडीनंतर सुप्रिया सुळे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बोलत होत्या. छगन भुजबळ यांचं जोरदार भाषण झाल्याच्या नंतर सुप्रिया सुळेंच भाषण सुरु झाले. सुप्रिया सुळे म्हणाल्या आता मला या मोठ्या भाषणा नंतर पुन्हा सिरीयस भाषण करावे लागणार आहे ते काम खूप अडचणीचं आहे. यावरून असे दिसते कि जयंतरावानी माझा कॅरेक्ट कार्यक्रम केला. सुप्रिया सुळे असे म्हंटल्यावर सभागृहात एकच हश्या पिकला. (Jayantrao acted my character “Supriya Sule why? said…)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या तुम्ही सर्वांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. येणारा काळच सांगेल मी ती जबाबदारी पेलू शकते कि नाही. परंतु मी तुम्हाला सर्वांना शब्द देते पक्षाने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या आहेत त्या पूर्ण निष्ठेने पार पाडले. माझा शाळेत, कॉलेजमध्ये कधी पहिला नंबर आला नाही. परंतु अनेक वेळा संसदेत माझ्या पहिला नंबर आला कि आनंद होतो.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पुढे शाळेतील निकालावर सुप्रिया सुळे यांनी गमतीशीर किस्सा सांगितला त्या म्हणाल्या माझा निकाल मी घरी कधीच कोणाला दाखवला नाही. तसेच माझ्या आणि दादाच्या निकालावरून घरात कधीच कोणी पेढे वाटले नाही. शाळेत कमी गुण मिळाले की घरचे म्हणणार अभ्यास करायला काय झालं होत. पण संसदेत पहिला नंबर आला किती मग म्हणणार जन्म कोणाच्या घरात झाला. त्यांच्या या भाषणामुळे सभागृहातील आणि मंचावरतचे सर्व जण हसू लागले.

Tags

follow us