रात्री ट्विट करत आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्री तुम्ही आपली मैत्री विसरले

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री या ना त्या कारणामुळं कायमच चर्चेत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडं शिंदे गटातील आणखी एक मंत्री चर्चेत आलेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार […]

Clipboard   December 27, 2022 8_35 AM

Clipboard December 27, 2022 8_35 AM

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री या ना त्या कारणामुळं कायमच चर्चेत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडं शिंदे गटातील आणखी एक मंत्री चर्चेत आलेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय, त्यात मुख्यमंत्री दादा भुसेंवर नेमकी काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केलाय.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ, एका हिरकणी कक्षांमधील असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडीओत मंत्री दादा भुसे दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येतंय. व्हिडीओ पोस्ट करत आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय.

व्हिडीओ ट्विट करत, आमदार आव्हाड म्हणाले की, पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब… कुठला गुन्हा पोलीस घेणार… पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली… आता बोला’, असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.

व्हिडीओत मंत्री दादा भुसे या तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. या तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे तरुणांना मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात येतं ? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे आज समजेल.

Exit mobile version