आप्पासाहेबांच्या भाविकांचं मतांमध्ये रुपांतर करण्याचा दृष्ट हेतू शिंदे-फडणवीस सरकारचा होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शिबीराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.
किरीट सोमय्यांचं विखेंच्या विरोधात मंत्रालयातचं ठिय्या आंदोलन
जितेंद्र आव्हाड म्हणाले, खारघरमधल्या मृत्यूंची खरी संख्या लपवली जात आहे. बाहेर मृतांचा आकडा 16 आलेला आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी प्रसारमाध्यमांच्या काही वृत्तवाहिन्यांनी गॉसिप करण्याचा प्रयत्न केला. खारघरमध्ये नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की उष्माघात याबाबत दुसऱ्या दिवसांपर्यंत कोणीच बोलायला तयार नव्हतं, व्हिडिओमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं आव्हाड म्हणाले आहेत.
शिमला मिरची 1 रुपये किलो, शेतकरी आक्रमक,रस्त्यावर मिरची फेकत केले आंदोलन
घटनेच्या दिवशी एक व्हिडिओ आला होता. त्यामध्ये दिसत होतं की मृत्यू उष्माघाताने नाहीतर चेंगराचेंगरीने झालायं. काल राज्य सरकारने एक समिती गठीत केली. समितीला यापुढे असं घडणार कसं नाही, याची चौकशी करण्यास सांगितलं पण हे घडलंय त्याबद्दल काही सांगितलं नसल्याचं ते म्हणाले आहेत.
Market Committee Election : राहुरी बाजार समितीचं चित्र स्पष्ट, भाजप-मविआमध्ये सरळ लढत
आप्पासाहेबांच्या भाविकांचं मतांमध्ये रुपांतर होण्याचा दृष्ट हेतू त्यांचा होता. आयोजकांनी सांगितलं की ही वेळ आप्पासाहेबांनी दिली होती, पण आप्पासाहेबांचे कार्यक्रम रात्रीच्यावेळी होतात त्यांनी कोणतीच वेळ दिली नव्हती. तर मग 12 ते 2 : 30 ही वेळ ठरवलीच कोणी? हा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी व्हावी, आणि मृतांच्या वारसांना एक कोटींसह शासकीय नोकरी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.