शिमला मिरची 1 रुपये किलो, शेतकरी आक्रमक,रस्त्यावर मिरची फेकत केले आंदोलन

  • Written By: Published:
शिमला मिरची 1 रुपये किलो, शेतकरी आक्रमक,रस्त्यावर मिरची फेकत केले आंदोलन

Shimla Mirch:  अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. फळे व भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान खूप जास्त नुकसान झाले आहे. आवक जास्त असल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळेही समस्या वाढत आहेत. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत.

पंजाबमध्ये शिमला मिरचीची स्थिती बिकट झाली आहे. शिमला मिरची घेऊन शेतकरी बाजारात पोहोचत आहेत. मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून 1 रुपये किलोने शिमला मिरची खरेदी करत आहेत. मानसा जिल्ह्यात शिमला मिरचीचे भरपूर उत्पादन झाले आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक सिमला मिरची पेरण्याचे आवाहन केले होते. मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. जास्त उत्पादन मिळाल्याने शेतकरी शिमला मिरची घेऊन मंडईत पोहोचले. पण तिथे त्याच्या शिमला मिरचीची किंमत 1 रुपये प्रति किलो ठरवण्यात आली. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर भरलेले सिमला मिरची रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक शिमला मिरची पेरण्याचे आवाहन केले होते. मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. जास्त उत्पादन मिळाल्याने शेतकरी शिमला मिरची घेऊन मंडईत पोहोचले. पण तिथे त्याच्या शिमला मिरचीची किंमत 1 रुपये प्रति किलो ठरवण्यात आली. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर भरलेले सिमला मिरची रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली.

अधिक आवक पाहून व्यापाऱ्यांनी शिमला मिरची 1 रुपये किलोने विकण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. पंजाबमध्ये 3 लाख हेक्टरमध्ये हिरव्या भाज्यांची पेरणी केली जाते. शिमला मिरचीचे उत्पादन 1500 हेक्टरमध्ये होते. फिरोजपूर, संगरूर आणि मानसा जिल्ह्यात शिमला मिरचीची सर्वाधिक लागवड होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube