Download App

जितेंद्र आव्हाडांना कसं अडकावयाच… याचा प्लॅन ठरतोय?

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On Target : सध्या ठाण्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुद्दामून टार्गेट केलं जात आहे. असं ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आंनद परांजपे यांनी ट्विट करत म्हंटल आहे.

आंनद परांजपे म्हणतात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्लॅन राज्यसरकार ठरवत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ठाण्यातील सत्ताधारी पक्षातील महत्वाची व्यक्ती यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये घोडबंदर रोड पासून मलबार हिल पर्यंत अनेक ठिकाणी बैठका झाल्या. बैठकीत एकच विषय होता की, जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणून जेलमध्ये कसं टाकायचं? असा यांचा प्लॅन आहे.

तसेच सध्या एका प्रकरणातील फेरचौकशी एका सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही जितेंद्र आव्हाड यांचे नाव घ्या तुम्हांला आम्ही ह्या केसमधून मोकळं करतो असे सांगितले जाते. आणि जितेंद्र आव्हाड यानां प्लॅन नुसार अडकवलं जात आहे.

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : शिवाजी कर्डिलेंच्या मैदानात कुस्ती लंके-विखेंची

एक व्हिडिओ फिल्म दाखविण्यात येते, ती काळीकुट्ट आहे. पण आग्रह धरला जातो की, इथे जितेंद्र आव्हाड उभे आहेत असे तुम्ही सांगायचं. आणि एक ऑडिओ क्लिप ऐकवली जाते की, ज्यामध्ये अस्पष्ट आवाज आहे. अशा पद्धतीने सापळा रचून आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्लॅन ठाण्यातील सत्ताधारी करत असल्याचा आरोप ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आंनद परांजपे यांनी केला आहे.

हे सरकार मूकं, बहिरं, आंधळं: अंबादास दानवे कडाडले

आता या आरोपांमध्ये किती सत्यता आहे हे वेळ आल्यावरच कळेल. खरंच राज्य सरकार असा कुठला प्लॅन करून आमदार जितेंद्र आव्हाड अडकवण्याचा प्रयत्न करत आहे कि ह्या फक्त अफवाच आहेत. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags

follow us