ज्योती वाघमारे राज्यसभेत; शिवसेनेत आश्चर्य आणि नाराजी, एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित

लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही खासदार बनवले.

Untitled Design 155

Untitled Design 155

Jyoti Waghmare in Rajya Sabha; Surprise and displeasure in Shiv Sena : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या सात जागांपैकी भाजपकडून चार, शिवसेना (शिंदे गट) कडून एक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून एक उमेदवार निवडून आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, या उमेदवारीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सुरुवातीला कमिटी स्थापन करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे सांगून ज्योती वाघमारे यांची कागदपत्रे घेतली होती. त्यानंतर त्यांना राज्यसभेसाठी अर्ज भरायचा असल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य महिलांना देखील राजकारणात स्थान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यावर आमचे लक्ष असते, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा देखील उल्लेख केला. मी आईची तगमग आणि पत्नीची काटकसर जवळून पाहिली आहे. त्यातूनच लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही खासदार बनवले, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

KYC नसेल तर गॅस नाही! सिलिंडर वितरणाचे नियम कडक, दोन सिलिंडरमधील अंतर आता 30 दिवस

आपल्या वैयक्तिक अनुभवांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, माझ्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी कार्यक्रमाला येणार नव्हतो. मात्र, लाडक्या-भाऊ बहिणींच्या प्रेमापासून दूर राहू नये म्हणून मी येथे आलो. त्यांनी पुढे सांगितले की, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले असून फूड ट्रकसारखे व्यवसाय देखील सुरू करण्यात मदत केली आहे. सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ ही माझी सर्वात मोठी ओळख आहे. असे देखील ते म्हणाले.

गेल्या काही काळापासून ज्योती वाघमारे या आक्रमकपणे शिंदे गटाच्या शिवसेनेची भूमिका मांडताना दिसत आहेत. ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक टीकेला त्यांनी ठाम आणि धारधार शब्दांत उत्तर दिले आहे. मात्र, पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत नवख्या असल्यामुळे त्यांना राज्यसभेसाठी संधी मिळेल, असे फारसे कोणालाही वाटत नव्हते. तरी देखील एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत त्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version