Karanji Ghat : अहिल्यानगर कडून पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्ता दरम्यान असलेल्या करंजी घाटामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून चार चाकी व रिक्षाच्या झालेल्या या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र सातत्याने या महामार्गावर होत असलेल्या अपघातांमुळे हा घाट मृत्यूचा सापळा बनला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करंजी घाटामध्ये (Karanji Ghat) अनेक धोकादायक वळणे आहे. यामुळे या घाटामध्ये सातत्याने वाहनांचे अपघात व यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असतो. वाहने सुरक्षित व सावकाश चालवावी असे फलक देखील घाटात लावण्यात आलेले आहे मात्र वांदाकांकडून नियमांची पायमल्ली करत अति वेगाने वाहने चालवणे व यामुळे घडत असलेल्या अपघातांमध्ये निष्पापांचा बळी जातो आहे.
पुण्याहून बीडकडे जाणाऱ्या एका थार जिपने एका रिक्षा चालकाला जोरदार धडक दिली. या ठिकाणी रिक्षाचा जागी चोराडा झाला या अपघातामध्ये रिक्षामधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर ठार देखील दुसरीकडे झाडावर जाऊन आदळली घडलेल्या घटनेबाबत गावकऱ्यांना माहिती समजतात घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. जमावाने तातडीने रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती दिली. दरम्यान सातत्याने या महामार्गावर ती वाहनांच्या अपघात दुर्दैवी मृत्यू झाले आहे. या महामार्गावरील मृत्यूचा रक्तरंजित सुरू असलेला थरार कधी थांबणार असा सवाल निर्माण होऊ लागला आहे.
R.B. Choudary : चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; निर्माते आरबी चौधरी यांचे रस्ते अपघातात निधन-
मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. 5) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
