Ahmednagar Accident : भीषण अपघात! करंजी घाटात ट्रक-टँकरची समोरा समोर धडक…

Ahmednagar Accident : भीषण अपघात! करंजी घाटात ट्रक-टँकरची समोरा समोर धडक…

Ahmednagar Accident : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Accident) पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी दुधाचा टँकर व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली असल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झाले असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान हा अपघात सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात ट्रक व टँकरचा अक्षरशः चुरा झालेला आहे.

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर

याबाबतची अधिक माहिती अशी, पैठणकडून एक ट्रक नगरच्या दिशेने चालला होता तर अहमदनगरकडून तिसगावकड. एक दुधाचा टँकर चालला होता. ट्रक व टँकर हे करंजी घाटात आले असता रात्री साडेबाराच्या सुमारास या दोघांची थेट समोरा समोर जोरदार धडक झाली.

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर

या अपघातामध्ये टँकर चालक शिवाजी नानासाहेब भवार (रा. निवडूंगे तालुका पाथर्डी) व ट्रक मधील जावेद शेख (रा. विहामांडवा तालुका पैठण) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक मधील ऋषिकेश मोटकर, गणेश गाभूर (रा. विहामांडवा तालुका पैठण) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

हा अपघात एवढा भयाण होता कि दोन्ही वाहने समोरा समोर धडकल्याने टँकर व ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात घडल्यानंतर नागरिकांनी व पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube