शेत जमीन नाही, महिंद्रा थार खरेदीसाठी 20 लाखांचा कर्ज; करुणा धनंजय मुंडेंची संपत्ती किती ?

Karuna Munde Wealth : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. ही निवडणूक

Karuna Munde Wealth

Karuna Munde Wealth

Karuna Munde Wealth : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न केले मात्र काँग्रेस यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केल्याने आता या निवडणुकीत बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणाऱ्या करुणा मुंडे यांनी देखील स्वराज्य शक्ति सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सोशल मीडियावर करुणा मुंडे (Karuna Munde) पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यांची एकूण संपत्ती किती याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चे होताना दिसत आहे.

करुणा मुंडे यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या प्रतिज्ञापत्रात करुणा धनंजय मुंडे असा स्वत : चा उल्लेख केला आहे. करुणा मुंडे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 10, 34,50,000 इतकी असून त्यापैकी जंगम मालमत्ता 2,34,50,000 आणि स्थावर मालमत्ता 8 कोटी रुपये आहे.  करुणा मुंडे यांच्याकडे 30 हजार रोख रक्कम आहे तर बँक आणि इतर ठिकाणी त्यांनी 87 लाखांची ठेवी ठेवल्या आहेत. तसेच त्यांनी आयसीआयसीआय जीवन विमा पॉलिसीमध्ये 17,00,000 ची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे महिंद्रा थार देखील असल्याचा उल्लेख या प्रतिज्ञापत्रात केला आहे. ही कार खरेदीसाठी त्यांनी 23  लाख रुपये खर्च केले आहे.

तर दुसरीकडे त्यांच्याकडे 900 ग्रॅम सोने (Gold) असून त्यांची आजची किंमत 1,24,20,000 इतकी आहे. तर या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर 20,00,000 रुपयांचा कर्ज असून महिंद्रा थार (Mahindra Thar) ही कार खरेदीसाठी त्यांनी येस बँकेकडून 20 लाखांचा (Yes Bank) कर्ज घेतला असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसून मुंबई आणि इंदौर शहरात त्यांच्याकडे निवासी इमारती असल्याचा उल्लेख त्यांनी या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. मुंबई आणि इंदौरमध्ये असणाऱ्या या निवासी इमारतीचे मुल्य 8 कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, गळफास घेण्यापूर्वी पतीशी वाद-

करुणा मुंडे यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीची थोडक्यात माहिती

रोख रक्कम – 30 हजार

ठेवी – 87,00,000

शेअर बाजारात गुंतवणूक नाही

आयसीआयसीआय जीवन विमा पॉलिसीमध्ये 17,00,000 गुंतवणूक

वाहन : महिंद्रा थार, किंमत 23,00, 000

सोने – 900 ग्रॅम ( आजची किंमत – 1,24,20,000)

कर्ज – 20,00,000 (कार लोन, यस बँक)

जंगम मालमत्ता – 2,34,50,000

स्थावर मालमत्ता 8 कोटी रुपये (निवासी इमारत – मुंबई आणि इंदौर)

Exit mobile version