मंत्री नरहरी झिरवळ यांचा काही दिवसांपूर्वी (NCP) एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यावर नरहरी झिरवळ यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे, हा व्हिडीओ फेक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या व्हिडीओवर आता करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, करुणा मुंडे यांनी या व्हिडीओबाबत मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नरहरी झिरवाळ यांचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी व्हायरल केला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांना मंंत्रिपदावर जाण्याची घाई झाली आहे, त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. नरहरी झिरवळ यांचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी व्हायरल केला आहे. त्यांना मंत्रिपदावर जाण्याची घाई झाली आहे, त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेणार का?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
हा माझा दावा आहे, परंतु त्यांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. नरहरी झिरवाळ यांचा व्हिडियो नेमका कसा व्हायरल झाला? याची सरकारने चौकशी करावी. धनंजय मुंडे यांची एसआयटी चौकशी करावी, धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशी देखील करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच, पहिलं लग्न माझ्याशी केलं, 2000 मध्ये 75 लाख रुपये घेऊन गेले. माझ्या हृदयाला छिद्र आहे, उपचारासाठी लंडनला जात आहे असे त्यांनी सांगितले.
माझी आई तारामती शर्मा यांनी कोणाच्या दबावाखाली विष प्राशन केले आणि त्यांचा मृत्यू झाला? असा सवालही यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे. 2019 मध्ये मंत्री झाल्यानंतर या लोकांकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? याची चौकशी व्हावी. राजश्री मुंडे, वाल्मिक कराड, राजू घवते, मोनिका सिंग, रेखा सिंग, स्वातिका शिरोडकर, लता पप्पी, अभय मुंडे, अज्या मुंडे यांच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करुणा मुंडे यांनी केली आहे.
