Download App

Video : कराडचा गेम धनंजय मुंडेच करू शकतात; भाजपचं नाव घेत करूणा मुंडे काय म्हणाल्या..

Karuna Sharma यांनी देखील कसलेंचीच री ओढली आहे. त्या म्हणाल्या धनंजय मुंडें हेच वाल्मिक कराडचा गेम करू शकतात.

Karuna Sharma on Dhananajay Sharma for Walmik Karad Encounter : निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी एक गंभीर दावा केला आहे की, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर होती. त्यासाठी मला 5 ते 50 कोटी देण्यात येणार होते. त्यावर आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी राहिलेल्या करूणा शर्मा यांनी देखील तीच री ओढली आहे. त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे हे वाल्मिक कराडकडे आहेत. त्यामुळे तेच वाल्मिक कराडचा गेम करू शकतात. तसेच त्यांनी यावेळी भाजपचा देखील उल्लेख केला आहे.

काय म्हणाल्या करूणा शर्मा?

भाजप खूप मोठी पार्टी आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रात चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे भाजप धनंजय मुंडेंना एंटरटेन करेल असं मला वाटत नाही आणि जरी केलं तर मी याला विरोध करणार आहे. धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे हे वाल्मिक कराडकडे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा गेम करू शकतात. त्यामुळे त्याला बीडमधून बाहेरील जेलमध्ये हलविले गेले पाहिजे. असा धक्कादायक दावा शर्मा यांनी केला आहे.

शुभचिंतकच्या नव्या पोस्टरमध्ये स्वप्नीलचा डॅशिंग अंदाज! चाहत्यांची उत्सुकता वाढली…

तसेच रणजित कासले यांनी स्वत: ला स्वाधीन केले आहे. पण त्यांनी आता पोलिसांना मदत केली पाहिजे. ज्या काही नेत्यांबद्दल त्यांच्याकडे माहिती आहे. त्यांनी ती माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी. ते भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करू शकतात. पोलिसांचा गैरवापर महाराष्ट्र सुरू आहे. कारण आपल्याकडील लग्नाचे पुरावे असलेल्या गोष्टी माझ्या घरातून नेण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र आपल्याला आता ते सर्व पुरावे असलेलेल्या गोष्टी भेटणार आहेत. असं देखील त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार आहे की, माहित नाही पण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. त्याचा खून होऊ शकतो. त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार आहे. त्यामधील झोपता-झोपता श्वास बंद पडतो. त्यामुळे एक तर त्याला मारला जाऊ शकतो किंवा तो कोठडीमध्ये मृत अवस्थेत सापडला जाऊ शकतो. असं घोषित केले जाऊ शकतो. कारण या प्रकरणामध्ये तो प्रमुख आहे. त्याच्यामुळे राजकीय पदावर असणारे मोठे मोहरे अडचणीत आले आहेत. म्हणून त्याला संपवले जाऊ शकते. धनंजय मुंडे यांची देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्रिपद गेले आहे. त्यानंतर करूणा शर्मांच्या प्रकरणामध्ये त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे राजकारणात मित्र वैगेरे गोष्टी स्वत: ला वाचवण्यासाठी लांब केल्या जाऊ शकतात. त्यामुळे धनंजय मुंडे किंवा त्यांचा गटच वाल्मिक कराडला संपवणार. असा दावा देसाई यांनी केला आहे.

काय म्हणाले रणजित कासले?

संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. यावेळी कासले यांनी एन्काऊंट कसा केला जातो याचीही माहिती दिली आहे. कासले यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दावे केले आहेत.

follow us