शुभचिंतकच्या नव्या पोस्टरमध्ये स्वप्नीलचा डॅशिंग अंदाज! चाहत्यांची उत्सुकता वाढली…

शुभचिंतकच्या नव्या पोस्टरमध्ये स्वप्नीलचा डॅशिंग अंदाज! चाहत्यांची उत्सुकता वाढली…

Gujrati Shubhchintak Movie Swapnil Joshi Look Poster : वर्षाच्या सुरुवातीपासून अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. अश्यातच स्वप्नील त्याचा चाहत्यांना वेगवेगळ्या भूमिकेत देखील दिसतोय. स्वप्नील सध्या सुशीला सुजीत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला, तरी त्याच्या आगामी गुजराती चित्रपटाच्या पोस्टरमुळे (Shubhchintak Movie) तो पुन्हा चर्चेत आलाय.

एकीकडे स्वप्नील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असला, तरी त्याचा (Swapnil Joshi Movie) कामाचा वाढता आलेख हा कायम उंचावताना दिसतोय. निर्माता आणि अभिनेता या दुहेरी भूमिका साकारून तो आता बहुभाषिक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय.

पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार, ‘या’ दिवशी सन्मानित करण्यात येणार

काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने त्याच्या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा केली. अनेक दमदार कलाकारांसोबत तो यात काम करताना दिसणार आहे, असं देखील कळतंय. ‘शुभचिंतक’ हा स्वप्नीलचा पहिला गुजराती चित्रपट असला तरी सुरुवातीपासून (Entertainment News) तो चर्चेत आहे. मराठी चित्रपट सृष्टी गाजवल्यानंतर आता स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार, यात शंका नाही.

शुभचिंतकच्या नव्या पोस्टरमध्ये स्वप्नीलचा डॅशिंग आणि तितकाच करारी लूक बघायला मिळतोय. स्वप्नील त्याचा आधीच्या भूमिकांपेक्षा यात नक्कीच काहीतरी वेगळी आणि तितकीच खास भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे.

निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू

या सगळ्याबद्दल बोलताना स्वप्नील सांगतो की, गेले काही दिवस प्रमोशन मध्ये व्यस्त असताना एकीकडे शुभचिंतकसाठी देखील मी खूप उत्सुक आहे. बॅक टू बॅक कामाच्या व्यापात व्यस्त राहणं, हे कोणत्याही कलाकाराला आवडतं. थोड्या दिवसात शुभचिंतकच प्रमोशन सुरू होणार आहे. हा गुजराती चित्रपट असल्याने नव्या भाषेत काम करण्याची गंमत या निमित्ताने अनुभवता आली आहे. सुशीला सुजीतनंतर लगेच नव्या चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मी देखील वाट बघतोय. मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारणारा स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात देखील तेवढ्याच दमदार पद्धतीने काम करणार, यात शंका नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube