Download App

औरंगजेबपेक्षा क्रुर मुंडे अन् गॅंगला धडा शिकवणार, हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; करूणा शर्मां आक्रमक

Karuna Sharma कडून मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुंडेंची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे.

Karuna Sharma on Dhananjay Munde for warn in Domestic Voilence : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. करुणा मुंडे प्रकरणात पुन्हा एकदा न्यायालयाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. त्यानंतर आता कौटुंबिक हिंसाचारासाठी देखील करूणा शर्मांकडून मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुंडेंची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे.

काय म्हणाल्या करूणा शर्मा?

माझ्या आईचा देखील कौटुंबिक हिंसाचारामुळेच बळी गेला आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या गॅंगने संतोष देशमुख यांना च्या कृत पद्धतीने मारलं तशा पद्धतीने औरंगजेबाने देखील कुणाला मारलं नसेल. धनंजय मुंडे आणि त्यांची गॅंग हे औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत. या गॅंगला अत्यंत माज आ.हे त्यांच्या सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही.

128 वर्षांनंतर ‘गोल्ड मेडल’ साठी भिडणार क्रिकेट संघ, 2028 ऑलिंपिकमध्ये अमेरिकेसह ‘या’ संघाला संधी?

त्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली. मी देखील 2008 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच माझ्या बहिणीवर अत्याचार करण्यात आला आहे. आणि त्यानंतर बलात्कार झालेला आहे. हे लोक अत्यंत खालच्या पातळीला जाऊन स्वतःची दोन मुलांची आई असलेल्या बायकोला देखील त्रास देत आहेत. याची काही सीमा असते.

वाल्मिक कराडाचा निर्दोष असल्याचा अर्ज, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सविस्तर

सध्या धनंजय मुंडे यांच्या गॅंगमध्ये असलेले हे गुंड आमच्या घरी केवळ एक स्लीपर घालून येत होते. ज्यांची आता कोट्याव द्यींची त्यांची संपत्ती आहे. मात्र धनंजय मुंडे यांची स्वतःची बायको मुला बाळांसह कोर्टाच्या खेट्या घालत आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या लोकांना यातून चांगला धडा शिकवला जाईल. हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे.

मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा; छगन भुजबळांनी नाराजी बोलून दाखवलीच…

त्यामुळे एकीकडे भाजपाकडून औरंगजेबाचा अत्याचार दाखवणारा छावा चित्रपट दाखवला जातो. मात्र दुसरीकडे औरंगजेबापेक्षाही स्वतःच्या मुलाबाळांवर बायकोवर देखील घृणास्पद अत्याचार करणाऱ्या धनंजय मुंडेला मंत्रीपद दिले जाते. अशी टीका देखील यावेळी करुणा शर्मा यांनी केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेलच आमदारकी देखील जाणार आहे. तसेच असे लोक समाजात राहण्याचे देखील लायकीची नाही.

follow us