128 वर्षांनंतर ‘गोल्ड मेडल’ साठी भिडणार क्रिकेट संघ, 2028 ऑलिंपिकमध्ये अमेरिकेसह ‘या’ संघाला संधी?

Los Angeles Olympics 2028 : तब्बल 128 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा पुनरागमन होणार आहे. या बाबतची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (IOC) देण्यात आली आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये (Los Angeles Olympics 2028) क्रिकेटचा सहभाग करण्यात आला असून या स्पर्धेत टी-20 स्वरूपात क्रिकेट खेळवण्यात येणार आहे.
2028 ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिलाचे प्रत्येकी 6-6 संघ सहभाग घेणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने बुधवारी लॉस एंजेलिस 2028 ऑलिंपिकसाठी खेळांचा कार्यक्रम आणि खेळाडूंची संख्या मंजूर केली असून यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी 90-90 खेळाडूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला 15 खेळाडूंचा संघ तयार करता येणार आहे. तर दुसरीकडे 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी क्रिकेट कुठे खेळवले जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
ऑलिंपिकमध्ये समाविष्ट झालेल्या पाच नवीन खेळांपैकी क्रिकेट हा एक आहे. दोन वर्षांपूर्षी आयओसीने 2028 च्या एलए ऑलिंपिकमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (षटकार) आणि स्क्वॅशसह क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने दिलेल्या माहितीनुसार, 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये 351 पदक स्पर्धा असणार आहे.
यजमान अमेरिकेला थेट प्रवेश?
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत म्हणजेच आसीसीमध्ये (ICC) अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे असे 12 पूर्ण सदस्य संघ आहे तर 94 देश सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे ऑस एंजेलिस ऑलिंपिक 2028 मध्ये कोणत्या सहा संघाला संधी मिळणार याकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरातांचे साटंलोटं, निवडणूक बिनविरोध…केवळ घोषणा बाकी
माहितीनुसार ऑलिंपिक स्पर्धा अमेरिकेत होणार असल्याने यजमान संघ म्हणून अमेरिकेला स्थान मिळणार आहे तर उर्वरित पाच संघ पात्रता फेरीतून आपले स्थान निश्चित करणार आहे.