Kasaba Byelection : कसबा पोटनिवडणुकीबाबत शिंदे गटाने स्पष्ट केली भूमिका, मंत्री केसरकर म्हणाले

पुणे : कसबा पोटनिवडणूक बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कसबा पोटनिवडणूक (Kasaba Byelection) शिंदे गट लढवणार नाही आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. युती कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान ही निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा […]

Untitled Design (7)

Untitled Design (7)

पुणे : कसबा पोटनिवडणूक बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कसबा पोटनिवडणूक (Kasaba Byelection) शिंदे गट लढवणार नाही आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. युती कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
Adadni FPO : गौतम अदानी यांनी स्वत:च सांगितले FPO मागे घेण्याचे कारण...|LetsUpp Marathi
दरम्यान ही निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यातच या निवडणुकीबाबत आता शिंदे गटाने आपली भूमिका जाहीर केली आहे. मंत्री केसरकर म्हणाले, राज्याची आत्तापर्यंतची एक परंपरा आहे. ज्याचे निधन झाले आहे. त्याच्या घरातील उमेदवार उभा राहिला तर निवडणूक बिनविरोध केली जाते.

त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. तसेच या निवडणूकीत शिंदे गट भाजपाला पांठिबा देणार आहे. शेवटी युती अभेद्य आहे. त्यामुळे योग्य असा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही जागा भाजपच्या होत्या. युतीचे पालन केले जाईल. भाजपला पाठिंबा राहणार. माझ्या मते ही निवडणुक बिनविरोध झाली पाहिजे, असे केसरकर म्हणाले आहे.

कसबा-पेठ मतदारसंघ:
पुण्यातील कसबा-पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आता त्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. 2019ला झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मुक्त टिळक यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला होता. टिळक यांनी तेव्हा 75,492 मते घेत त्या तब्बल 28,000 च्या मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या.

Exit mobile version