Download App

KC Venugopal नाना पटोलेंच्या खिशात, पटोलेंना वाचवण्यासाठीच समिती, देशमुखांचा आरोप

  • Written By: Last Updated:

“काँग्रेस नेते वेणुगोपाल हे नाना पटोले यांच्या खिशात आहेत. त्यामुळे या चौकशी समितीचा काही फरक पडणार नाही.” अशी आपल्याच पक्षावर टीका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसमधील वादावर काँग्रेसकडून एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यावर आज आशिष देशमुख बोलत होते.

वेणुगोपाल यांच्याकडून नाना पटोले यांचे लाड केले जात आहेत, अशी खोचक टीकाही देशमुख यांनी आपल्याच नेतृत्वावर केली आहे. नाना पटोले पक्षात आल्यापासून त्यांना अनेक महत्वाची पदे दिली आहे. भाजप सोडल्यापासून त्यांना ८ महत्वाची पदे दिली गेली, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे या समितीमुळे नाना पटोले यांची उचलबांगडी होईल, असं वाटतं नसल्याचंही ते म्हणाले.

रमेश चेन्निथला यांची समिती

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर अहवाल देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये सत्यजित तांबे यांच्या विधानपरिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या वादावर काँग्रेस हायकमांकडून एक सदस्यीय समिती नेमून नाना पटोले आणि थोरात-तांबे वादावर आढावा घेण्यास सांगितले आहे. दिल्लीतून नेमलेल्या या समितीमुळे पुन्हा एकदा राज्यात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्यामुळे अशा परिस्थिती मध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद अजूनही मिटेल असं दिसत नाही.

Tags

follow us