खरात-चाकणकर कॉल कनेक्शन उघड? 33,727 सेकंदांच्या संभाषणाचा दावा, CDR समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

खरातने कोणाला कॉल केले, त्याला कुणी कॉल केले, तसेच कोणाशी किती वेळ संवाद झाला याची माहिती या रेकॉर्डमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

Untitled Design 25

Untitled Design 25

Kharat-Chakankar call connection exposed? : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता या प्रकरणाने आणखी एक मोठे वळण घेतले आहे. अशोक खरातचा कथित सीडीआर समोर आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या सीडीआरमुळे खरातच्या संपर्कातील व्यक्तींबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

अंजली दमानिया यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अशोक खरातचा सीडीआर पाठवला आहे. या सीडीआरमधून मागील वर्षभरातील कॉल्सचा तपशील समोर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. खरातने कोणाला कॉल केले, त्याला कुणी कॉल केले, तसेच कोणाशी किती वेळ संवाद झाला याची माहिती या रेकॉर्डमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

दमानिया यांच्या आरोपानुसार, रुपाली चाकणकर यांनी मागील वर्षभरात अशोक खरातला तब्बल 177 वेळा कॉल केले आहेत. खरातच्या मुलगी तृप्तबाला खरात हिच्यानंतर सर्वाधिक कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर यांचे नाव समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघांमध्ये एकूण 33,727 सेकंद म्हणजेच सुमारे 9 तास 36 मिनिटे संवाद झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, रुपाली चाकणकर यांच्या बहिणीनेही खरातला 236 वेळा कॉल केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात इतर काही प्रमुख राजकीय नेत्यांची नावेही समोर आली आहेत. दमानिया यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षभरात अशोक खरातशी 17 वेळा संपर्क साधला. यामध्ये 10 इनकमिंग आणि 7 आऊटगोइंग कॉल्सचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलार यांच्याही नावांचा या कथित सीडीआरमध्ये उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांनी प्रत्येकी 8 वेळा, तर आशिष शेलार यांनी एकदा खरातशी संपर्क साधल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे. या कथित सीडीआरमुळे प्रकरणात राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यांवर संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता आणि पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

Exit mobile version