Download App

धर्माधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करा, खारघर प्रकरणी याचिका दाखल

Kharghar Maharashtra Bhushan Program : खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित श्रीसदस्यांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला. तसेच उष्मघातामुळे काही जणांचा मृत्यू देखील झाला. दरम्यान याच घटनेवरून आता सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात (Maharashtra Bhushan Sohala) उष्माघातामुळे 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. एकीकडे विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. विरार येथील सामाजिक कार्यकर्ता शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी हायकोर्टात (High Court) दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुरस्कारप्राप्त अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन

तसेच या याचिकेत महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खर्च केलेले 14 कोटी रुपये आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. व्हीआयपी पाहुणे एसीमध्ये जेवले, तर लोकांना मरण्यासाठी सोडून दिलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील ‘हे’ दोन खेळाडू अपघातातून थोडक्यात बचावले

या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं येणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून या कार्यक्रमाचं ढिसाळ आयोजन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी उन्हापासून संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा अभाव, पाणी, वैद्यकीय सुविधा या दुर्लक्ष हे सारे मुद्दे याचिकेतून उपस्थित केले गेले आहेत. महाराष्ट्र भूषण हा शासकीय पुरस्कार असल्यामुळे जनतेचा पैसा यामध्ये अयोग्य पध्दतीने वापरला असा आरोप याचिकेत केला आहे.

Tags

follow us