Download App

खाशाबा जाधवांचा जन्मदिवस ‘राज्यक्रीडा दिन’ म्हणून साजरा; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

कुस्तीपट्टू खाशाबा जाधव(Khashaba Jadhav) यांचा जन्मदिन 15 जानेवारी ‘राज्यक्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यात शिवछत्रपती पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराला विशेष महत्व आहे, खाशाबा जाधव यांनीही 1952 साली हेलसिंकीमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारतासाठी पदक पटकावलं होतं. त्यांच्या जन्मदिन 15 जानेवारी हा दिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Horoscope Today 28 August 2023: ‘या’ राशींचा भाग्य उजळणार! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

तसेच शिवछत्रपती पुरस्काराच्या रोख रक्कमेत वाढ करण्याचीही घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांन केली आहे. या पुरस्कारामध्ये आधी 1 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येत होते. आता 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

आता राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादांकडेच आहे. त्यामुळे तिजोरीतून कितीही बाहेर काढले तरी ते वाढतच जाणार असल्याचं मुख्यमंत्री मिश्लिक अंदाजात म्हणाले आहेत. दरम्यान, शिवछत्रपती पुरस्कारात रक्कम वाढल्याची घोषणा करत त्यांनी खेळाडूंना आपला झेंडा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवावा असं आवाहनही केलं आहे.

Tags

follow us