Khawaja Asif : एकीकडे अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरु असून या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे पाकिस्ताने संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. भविष्यात भारताकडून कोणतीही लष्करी कारवाई झाली तर कोलकातापर्यंत पोहोचणारा हल्ल्याने प्रत्युत्तर देण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले.
आसिफ (Khawaja Asif) यांनी असाही दावा केला, “असे अहवाल आहेत की (भारताद्वारे) एक अपप्रचार मोहीम रचली गेली आहे. ही मोहीम त्यांच्या स्वतःच्या नागरिकांमार्फत किंवा पाकिस्तानी नागरिकांमार्फत राबवली जात आहे. यामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी मृतदेह टाकणे आणि ते मृतदेह दहशतवाद्यांचे असून त्यांनीच विशिष्ट कृत्ये केली होती, असा खोटा दावा करणे समाविष्ट आहे असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. यापूर्वी गुरुवारी, आसिफ यांनी म्हटले होते की, कोणत्याही हल्ल्याला पाकिस्तानचे प्रत्युत्तर त्वरित, सुनियोजित आणि निर्णायक असेल.
तर दुसरीकडे राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी म्हटले होते की, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, भारताच्या शेजारील देशाने केलेले लष्करी साहसाचे कोणतेही कृत्य अभूतपूर्व आणि निर्णायक प्रत्युत्तराला निमंत्रण देणारे ठरेल. गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये चार दिवस चाललेला संघर्ष उफाळून आला होता.
बारामती पोटनिवडणूक, काँग्रेस उद्या दाखल करणार अर्ज; आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
राजनाथ सिंह काय म्हणाले?
गुरुवारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत, पाकिस्तानने केलेल्या लष्करी साहसाच्या कोणत्याही कृत्याला अभूतपूर्व आणि निर्णायक प्रत्युत्तराने सामोरे जावे लागेल. निवडणुका होऊ घातलेल्या केरळ राज्यात आयोजित ‘सैनिक सन्मान संमेलना’त बोलताना, सिंह यांनी आठवण करून दिली की, एप्रिल 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ यशस्वीरित्या उद्ध्वस्त केले होते.
