Operation Sindoor 22 मिनिट संपवलं अन् 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार; लोकसभेत राजनाथ सिंह यांनी दिली A टू Z माहिती

Operation Sindoor : संसदेच्या पावसाळी अधिवेशानात आजपासून लोकसभेत (Lok Sabha) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली असून 16 तास चालणाऱ्या या चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh ) यांनी केली आहे. या चर्चेत लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील सहभाग घेणार आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले असल्याची माहिती लोकसभेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच, आपल्या सशस्त्र दलांनी कारवाई केली होती आणि या कारवाईत नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचुक हल्ला करण्यात आला ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक ठार झाले असं राजनाथ सिंह म्हणाले. तसेच ऑपरेशन सिंदूरचा उद्देश सीमा ओलांडणे किंवा तेथील प्रदेश ताब्यात घेणे नव्हता. या ऑपरेशनचा उद्देश पाकिस्ताने वर्षानुवर्षे जोपासलेल्या त्या दहशतवाद्यांच्या नर्सरी नष्ट करणे होता असं देखील ऑपरेशन सिंदूर चर्चेदरम्यान राजनाथ सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली.
ऑपरेशन सिंदूर फक्त 22 मिनिटांत संपवलं
या चर्चेदरम्यान ऑपरेशन सिंदूरवरुन राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्षातील काही लोक विचारत आहेत की, आमची किती विमाने पाडण्यात आली? मला वाटते की त्यांचा प्रश्न आमच्या राष्ट्रीय जनभावनांते योग्य प्रतिनिधित्व करु शकत नाही. विरोधकांनी आम्हाला एकदाही विचारले नाही की आमच्या सैन्याने किती शत्रूची विमाने पाडली? जर त्यांना प्रश्न विचारायचे असेल तर त्यांचा प्रश्न असा असावा की भारताने दहशतवादी अड्ड्या नष्ट केल्या का, ज्याचे उत्तर हो आहे. असं राजनाथ सिंह म्हणाले. तसेच भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर फक्त 22 मिनिटांत संपवलं आणि यानंतर भारताने पाकच्या डीजीएमओशी संपर्क साधून माहिती दिली. असं देखील यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.
VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण… हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
26 पर्यटकांचा मृत्यू
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर येथील पहगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले करत बदला घेतला होता.