देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही; ‘या’ महाराजांचे वादग्रस्त विधान!

अमरावती : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज? आपले […]

FHrAYXmVIAINUYK

FHrAYXmVIAINUYK

अमरावती : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?
आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?” असे सवाल कालीचरण महाराज यांनी केले आहेत.

तसेच पुढे बोलताना म्हणाले, आपले सगळे देवी-देवता हिंसक आहेत. उद्देश देश, धर्मासाठी असेल तर खून करणे काही वाईट नाही, असेही कालीचरण महाराज म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे कालीचरण महाराज पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, यापूर्वी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. तसेच गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केले होते. याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल आहे.

Exit mobile version