Download App

किसान सभा आक्रमक; महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर राज्यव्यापी पायी मोर्चा

Kisan Morcha Akole to Loni : अतिवृष्टी नुकसान भरपाई(Flood Damage Compensation), जमिनीचे हक्क(Land rights), कापूस(Cotton), सोयाबीन (soybeans)व शेती मालाला रास्त भाव(Fair price for agricultural produce), दुग्ध पदार्थ आयातीला विरोध, जमीन अधिग्रहण रास्त भरपाई, ग्रामीण कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यासाठी किसान सभा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. सरकारकडून गायरान जमिनीबाबत दिलेलं आश्वासन देऊन एक महिना पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर राज्यभरात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामध्ये झालेल्या नुकसानीची मदत न झाल्याने त्याचबरोबर इतरही मागण्या मान्य न झाल्यामुळे किसान सभा पायी मोर्चा काढणार आहे. अकोले ते लोणी (Akole to Loni)(जि.अहमदनगर)दरम्यान किसान सभा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या कार्यालयावर 26 ते 28 एप्रिल दरम्यान पायी मोर्चा काढणार आहेत.

Satyapal Malik : सत्यपाल मलिक पोलिसांच्या ताब्यात, राज्यपाल असतांना मलिक गप्प का होते? शाहांचा सवाल

दरम्यान याबाबत किसान सभेकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की, शेतकऱ्यांबद्दल ज्यांना सहानुभूती आहे, त्यांनी तो फोटो आपल्या सोशल मीडियावर ठेवावा असे आवाहन किसान सभेकडून करण्यात आले आहे.

अकोले ते लोणी दरम्यान पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पायी मोर्चामध्ये किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

या मोर्चामध्ये देवस्थान इनाम जमिनी, वर्ग तीनच्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्याचा मुद्दाही या मोर्चात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुधालाही एफआरपीचं संरक्षण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेली समिती शिंदे फडणवीस सरकारने गुंडाळून टाकली आहे.

या समितीचे अध्यक्ष हे अजित पवार होते. त्याचबरोबर राज्य सरकारने दूध आयातीचे धोरण अवलंबले आहे. तसेच कामगार आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, सोयाबीन कापूस यांचे पडलेले भाव अशा विविध 18 मागण्या या पायी मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार असल्याचे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सांगितले आहे.

Tags

follow us