Satyapal Malik : सत्यपाल मलिक पोलिसांच्या ताब्यात, राज्यपाल असतांना मलिक गप्प का होते? शाहांचा सवाल
Former Governor Satya Pal Malik in police custody : जम्मू-काश्मीरसह चार राज्यांचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले (police custody). मलिक यांच्या समर्थनार्थ ईश्वर नैन सह आलेल्या अनेक खाप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दिल्ली पुलिस ने पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक के साथ खाप नेता ईश्वर नैन सहित अन्य लोगों को हिरासत में लिया।
पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक व अन्य को आर के पुरम से हिरासत में लिया गया। pic.twitter.com/3sbppcsHBT
— Ajay Jha (@Ajay_reporter) April 22, 2023
हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी अनेक खाप चौधरी आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेल्याचे सांगण्यात येत आहे. मलिक यांना आधी आरके पुरम आणि नंतर छवला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्याचवेळी दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सेक्टर-12 पार्कमध्ये परवानगीशिवाय एक कार्यक्रम सुरू होता. तो थांबल्यावर मलिक तेथून निघून गेले. मात्र नंतर मलिक यांनी स्वतः आरके पुरम पोलीस ठाणे गाठले.
False information is being spread on social media handles regarding detention of Sh. Satyapal Malik, Ex. Gov.
Whereas, he himself has arrived at P.S. R K Puram alongwith his supporters. He has been informed that he is at liberty to leave at his own will.#DelhiPoliceUpdates
— Delhi Police (@DelhiPolice) April 22, 2023
अमित शाह म्हणाले – मलिक यांची विश्वासार्हता नाही
सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच दावा केला होता की, पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरफीएच्या ताफ्यावलर भयंकर हल्ला झाला. ही मोदी सरकारची चुकच होती. सरकारच्या अकार्यक्षम आणि हलगर्जीवृत्तीमुळं हा हल्ला झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्पोट केला होता. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी सत्यपाल मलिक यांच्या दाव्यावर आक्षेप घेत जोरदार हल्ला चढवला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सत्यपाल मलिक यांच्या खुलाशांशी संबंधित प्रश्नावर शाह म्हणाले की, तुम्हीही त्यांना विचारा की, आम्हाला सोडून गेल्यानंतरच त्यांना या सर्व गोष्टी का आठवत आहेत? सत्तेत असताना त्यांचा विवेक का जागृत होत नाही? असा सवाल त्यांनी केला. मलिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाह यांनी सांगितले की, आता देशातील नागरिकांनी याचा याचा विचार करायला हवा.
सीबीआयने समन्स पाठवले, केंद्राने नाही
पुलवामावरील वक्तव्यामुळे CBI ने मलिक यांना समन्स बजावल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. काँग्रेस आणि आप नेत्यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारला घेरले. यावर शाह यांनी सांगितले की, मलिकांना पाठवलेले समन्स केंद्रातील सरकारचे नाहीत, तर ते समन्स CBI चे होते.
काय म्हणाले सत्यपाल मलिक?
एका मुलाखतीदरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविषयी अनेक सवाल उपस्थित केले होते्. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला. त्यांनी असा दावा केला होता की, एवढा मोठा ताफा कधीच रस्त्याने जात नाही आणि म्हणून CRPF ने गृह मंत्रालयाकडे विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, ती नाकारण्यात आली. CRPFला फक्त 5 विमानांची गरज असल्याचे मलिक यांनी म्हटले होते.
ते म्हणाले होते की, मोदींनी मला फोन केला आणि आमच्या चुकीमुळे हे घडल्याचे सांगितले. यावर त्यांनी मला शांत राहण्यास सांगितले आणि कोणालाही काहीही बोलू नका. मलिक यांनी अजित डोवाल यांच नाव घेत सांगितलं होतं की, लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी सरकार पाकिस्तानवर दोषारोप करणार असल्याचे समजले होते.
मलिक म्हणाले- विमा घोटाळ्यात सीबीआयने चौकशीसाठी बोलावले
Reliance Insurance प्रकरणात CBI आपली चौकशी करू इच्छिते, असे मलिक यांनी काल सांगितले. त्यांना अकबर रोड गेस्ट हाऊसमध्ये बोलावण्यात आले आहे. मी राजस्थानला जात आहे, त्यामुळे CBI 27 ते 29 एप्रिलची तारीख दिली आहे, असेही ते म्हणाले.
मलिक यांनी दावा केला होता की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना 2 फाईल बंद करण्यासाठी तीनशे कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. यातील एक फाइल संघाच्या (RSS) च्या नेत्याशी संबंधित होती. तर दुसरी फाईल ही अंबानीशी संबंधित होती. याप्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
दरम्यान, शाह यांनी सांगितले की, आम्हाला सोडून गेल्यानंतरच त्यांना या सर्व गोष्टी का आठवत आहेत? सत्तेत असताना त्यांचा विवेक का जागृत होत नाही? शाह यांनी मलिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाह म्हणाले की, भाजपने असे कोणतेही काम केलेले नाही, जे लपवण्याची सरकारवर वेळ येईल.