‘तर मग तुम्ही शपथच घ्यायला नको होती’ ; अजितदादांच्या वक्तव्यावर पटोले संतापले
Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी बाजार समिती निवडणुकीत एका ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी विरोधी असल्याचेही म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनीही पटोले यांना फटकारत काँग्रेस नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये तत्काळ थांबवावीत असे म्हटले होते. त्यानंतर आता पु्न्हा अजित पवार यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीवरून नाना पटोले (Nana Patole) संतापले आहेत.
अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की कुणाबरोबर काम करताना तुम्हाला आनंद वाटला ? या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि चव्हाण या दोघांनाही मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नव्हता. चव्हाण यांच्या कार्यकाळात चार वर्षे काम केले, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री असताना चांगले काम केले. कधी समाधानाने तर कधी नाईलाजाने काम केल्याचे पवार म्हणाले.
धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…
त्यांच्या या वक्तव्यावर पटोले यांनी आज आक्रमक प्रतिक्रिया दिली. ते अजित पवार यांना उद्देशून म्हणाले, नाईलाज हा शब्द का वापरत आहात ? असे होते तर मग तुम्ही शपथच घ्यायला नको होती. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पद सोडून बोलायला पाहिजे होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी अजित पवार बोलतील ही अपेक्षा नव्हती. त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. ते खुर्चीवर असताना तुम्हाला असं वाटत होतं तर त्यावेळीच सोडून जायला हवं होते, असे पटोले म्हणाले.