Uorfi Javed : कोई इस औरत को बताओ.., ‘सासू-सूने’चा वाद पुन्हा उफाळणार?

मुंबई : वाकयुद्धानंतर अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा वाद मिटला होता. आता शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा एकदा उर्फीने (Uorfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे. उर्फीने (Uorfi Javed) ट्विट करत माझ्या कपड्यांविरोधात जेव्हा बोट उचललं होतं तेव्हाचा टाईम विसरली असल्याचा टोला उर्फीने चित्रा वाघ यांना […]

Chitra Wagh

Chitra Wagh

मुंबई : वाकयुद्धानंतर अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा वाद मिटला होता. आता शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा एकदा उर्फीने (Uorfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे. उर्फीने (Uorfi Javed) ट्विट करत माझ्या कपड्यांविरोधात जेव्हा बोट उचललं होतं तेव्हाचा टाईम विसरली असल्याचा टोला उर्फीने चित्रा वाघ यांना लगावला आहे.

शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राज्यभरातून महिला नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच शीतल तू घाबरु नकोस आम्ही तुमच्यासोबत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

ज्यांनी हे केलं त्या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा, असं आवाहन चित्रा वाघ यांनी पोलिसांनी केलं. दरम्यान, राजकारणात कोणत्याही महिलेसोबत असं घडू शकतं असं भाकीतही त्यांनी यावेळी केलंय.

लाऊड-स्पीकरवर ओरडण्याची.., अजानवर भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांचं वादग्रस्त विधान

वाघ यांच्या या भूमिकेवर उर्फीने बोट ठेवत ट्विटरद्वारे एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये उर्फी म्हणाली, “अपना टाईम भूल गयी जब मेरी कॅरेक्टर पर उंगली उठा रही थी मेरे कपडों की वजह से…मुझे जेल भेजने की मांग कर रही थी| खुले आम मेरा सर फोडने की धमकी दी थी| वाह वाह वाह… हायप्रोसिकी भी सीमा होती है कोई इस औरत को बताओ|” या शब्दांत तिने वाघ यांना खडेबोल सुनावले आहेत.

अखेर एकदा वाद मिटल्यानंतर आता पुन्हा एकदा उर्फीने डिवचल्याने वाघ आणि चित्रा वाघ यांच्यात वाद उफाळणार असल्याची चर्चा रंगत आहेत. उर्फीच्या या ट्विटवर चित्रा वाघ काय भूमिका घेणार? याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Exit mobile version