Kolhapur Police recover Prashant Koratkar passport who threat Indrajit Sawant : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी जप्त केला आहे. कोरटकरच्या पत्नीनेच हा पासपोर्ट पोलिसांना सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता कोरटकर हा देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
आज ‘IPL’ २०२५ हंगामातील पहिला सामना; विराट कोहली खेळणार ४०० वा टी-२० सामना
दरम्यान प्रशांत कोरटकर हा परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. (Kortkar ) कोलकाता विमानतळावरुन तो दुबईला पळाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. कोरटकरचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर कोरटकरने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याच आता बोललं जात होतं. मात्र आता त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आता कोरटकर हा देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अचानक फोन करुन प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं शिवीगाळ करायला सुरुवात केली होती. तसंच चुकीचा इतिहास का सांगता असं विचारताना त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप खुद्द इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली होती. तसंच कोरटकरवर कारवाईची मागणी केली होती. यासाठी त्यांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
Video : परब अन् आक्रमकता?; भर पत्रकार परिषदेत राणेंनी हातवारे करत उडवली खिल्ली
दरम्यान, इंद्रजीत सावंत यांची पोलिसांनी या प्रकरणी सात तास चौकशी केली होती. तसंच, त्यांच्या फोनवर आलेल्या या कॉलची फॉरेन्सिक तपासणी केली. तसंच सीडीआर देखील तपासले यामध्ये हा फोन कॉल खरा असल्याचं उघड झालं, त्यामुळं या ऑडिओ क्लीपमध्ये कुठलीही छेडछाड झालेली नसून तो कोरटकरचाच आवाज असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऑडिओ क्लीप फेकचा दावा
कोरटकरच्या आक्षेपार्ह विधानामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये या प्रशांत कोरटकरविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण पेटल्याचं लक्षात येताच कोरटकरनं घुमजाव करत आपला हा आवाज नसल्याचा दावा केला. तसंच ही फेक ऑडिओ क्लीप असल्याचंही त्यानं म्हटल. पण अखेर त्याचा हा दावा फोल ठरला आहे.