आज ‘IPL’ २०२५ हंगामातील पहिला सामना; विराट कोहली खेळणार ४०० वा टी-२० सामना

आज ‘IPL’ २०२५ हंगामातील पहिला सामना; विराट कोहली खेळणार ४०० वा टी-२० सामना

 KKR vs RCB IPL 2025  : इंडियन प्रिमिअर लीग २०२५ हंगामातील पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये रंगणार आहे. आजचा सामना आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (IPL) हा खास सामना असणार आहे. कारण कोहली आज आपला ४०० वा ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फोलंदाज आज आयपीएलमध्ये आपले नववे शतक झळकावेल अशी चाहत्यांना आशा आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) आयपीएल स्पर्धेत ३५ वेळा आमनेसामने आले आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघाने २१ तर आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. कोलकाता येथे दोन्ही संघांमध्ये १२ सामने खेळविण्यात आले असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाने सर्वाधिक ७ आणि आरसीबीने ५ विजय संपादन केले आहेत.

IPL 2025 : ठरलं! आयपीएलचा थरार या दिवसापासून रंगणार, BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा

दोन्ही संघांमध्ये अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ विजय संपादन केले आहेत. विशेष म्हणजे आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात फील सॉल्ट, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर वैभव आरोरा हर्षित राणा, श्रेयस अय्यर , वरूण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

तर विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज फील सॉल्ट यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी कोणती जोडी सलामीला येणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजीची जबाबदारी अजिंक्य रहाणे, क्विंटन डिकॉक, रेहमनुलला गुरबाझ, अंगक्रिश रघुवंशी,मनीष पांडे, रिंकुसिंग, आंद्रे रसेल, यांच्यावर असणार आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल, सुनील नारायण, अनुकूल रॉय, व्यंकटेश अय्यर, रमणदीपसिंग मोईन अली आहेत. गोलंदाजीत हर्षित राणा, वैभव आरोरा, एनरिक नॉरकिया, वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल, स्पेंसर जॉनसन, उमरान मलिक हे पर्याय उपलब्ध आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या