चेन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण, विराट कोहली जबाबदार, उच्च न्यायालयात अहवाल सादर

चेन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण, विराट कोहली जबाबदार, उच्च न्यायालयात अहवाल सादर

Bengaluru Stampede : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किग्जचा पराभव करत आरसीबीने (RCB) पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद (IPL 2025) पटकावले होते. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी मॅनेजमेंटकडून बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने चेंगराचेंगरी झाली होती आणि या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता तर 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

उच्च न्यायालयात अहवाल सादर

तर आता या प्रकरणाचा अहवाल कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात (Karnataka High Court) सादर केला आहे. या अहवालात सरकारने चेंगराचेंगरीसाठी आरसीबी संघासह विराट कोहलाही जबाबदार धरले आहे. कर्नाटक सरकारने या अहवालात म्हटले आहे की, आरसीबीने शहर पोलिसांची परवानगी न घेता चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी परेडसाठी लोकांना आमंत्रित केले होते. आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर यासाठी पोस्ट केला होता आणि लोकांना फ्रीमध्ये प्रवेश देण्याची माहिती दिली होती.

3 लाखांपेक्षा जास्त लोक चेन्नास्वामी स्टेडियमवर जमले

तर 4 जून रोजी सकाळी 8.55 वाजता आरसीबीकडून विराट कोहलीचा एक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने 4 जून रोजी बंगळुरुमध्ये शहरातील लोकांसह आणि आरसीबी चाहत्यांसोबत हा विजय साजरा करणार असल्याची माहिती दिली होती. या व्हिडिओनंतर 3 लाखांपेक्षा जास्त लोक चेन्नास्वामी स्टेडियमवर जमले होते. पोलिसांना एकाच वेळी इतक्या लोकांना हँडल करता आले नाही आणि आयोजकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी पास असल्याची माहिती स्टेडियमवर दिल्याने गोंधळ निर्माण झाला. याशिवाय गेट उघडण्यास देखील उशीर झाल्यामुळेही दुर्घटना घडली असं कर्नाटकाने सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

जनसुरक्षा विधेयकावेळी मारली दांडी, हायकमांडची नोटीस पण, वडेट्टीवार म्हणाले, मला…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube