अफवा उडाली, बॅरिगेट तुटले अन्… संभाजीनगरच्या तरुणाने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

अफवा उडाली, बॅरिगेट तुटले अन्… संभाजीनगरच्या तरुणाने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबीने आयपीएल 2025 च्या (IPL 2025) फायनलमध्ये पंजाबचा पराभव करत तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल जेतेपद पटकावले. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी 04 जून रोजी  बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर (Chinnaswamy Stadium) हजारो लोक जमा झाले होते मात्र येथे अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

विजयाचा जल्लोष करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून देखील काही जण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पोहोचले होते. त्यापैकी एक रवी पाटील (Ravi Patil) . रवी देखील 04 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर उपस्थित होता. रवीने आज माध्यमांशी बोलताना अचानक चेंगराचेंगरी का झाली याबाबात सविस्तर सांगितले आहे.

कर्नाटका पोलिसांनी व्हिक्ट्री परेड (Victory Parade) रद्द करण्यात आली असल्याची माहिती दिल्यानंतर हजारोच्या संख्येने लोक जल्लोष करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचत होते. 18 नंबर गेटबाहेर देखील हळूहळू गर्दी वाढत गेली आणि स्टेडियममध्ये आत जाण्यासाठी तिकीट बूक होत नसल्याने अनेक जण घरी जाण्यासाठी निघत होते मात्र तिथे काही तरुणांनी दारु घेतली होती. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी गेट ओपन होत असल्याची अफवा उडवली त्यामुळे मागची गर्दी पुढे सरकली तर अनेकांनी स्टेडियममध्ये जाण्यासाठी बॅरिगेट तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे गर्दी वाढत असल्याने काही जण चक्कर येऊन खाली पडत होते. तर अनेकांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आम्ही भिंतीवर उडी मारली आणि चिन्नास्वामी स्टेडियमच्या आत गेलो. स्टेडियममधून बाहेर आल्यानंतर मला आईचा कॉल आला आणि त्यांच्याकडून मला या घटनेची माहिती मिळाली असं रवी पाटीलने माध्यमांना सांगितले. तसेच गर्दी वाढत असल्याने योग्य मॅनेजमेंट झाला असता तर कदाचित ही घटना घडली नसती असं देखील रवीने सांगितले.

18 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पहिल्यादांच जेतेपद पटावल्याने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जल्लोष साजरा करण्यात येणार होता मात्र या कार्यक्रमा दरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेत 50 जण जखमी झाले.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा, इराणसह 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत बंदी 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube