आयपीएल सामना अन् ‘एलिट’ जागांवरून IPS – IT अधिकाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये वाद

IPL Elite Seats Clash : संपूर्ण देशात सध्या आयपीएलची क्रेज पाहायला मिळत आहे. शनिवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जचा समाना पार पडला. या सामन्यात आरसीबीने बाजी मारली मात्र हा सामना एका वेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे. माहितीनुसार या सामन्यादरम्यान बसण्याच्या जागेवरुन आयपीएस (IPS) अधिकाऱ्याच्या कुटुंब आणि आयकरच्या कुटुंबामध्ये ( I-T officer) वाद झाला. हा वाद इतका वाढला की, दोन्ही कुटुंबानी एकामेकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, आयटी आयुक्तांच्या पतीने आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या सीटवर कथितरित्या बसल्याने हा वाद सुरू झाला. आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी काही कामासाठी बाहेर गेली असता आयटी आयुक्ताच्या पती मुलीच्या सीटवर बसला आणि मुलीला धमकी देत विनयभंग केला असल्याचा आरोप आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने केला आहे. शनिवारी रात्री दोन्ही पक्षांनी क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये (Cubbon Park Police Station) एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने धमकी, लैंगिक छळ आणि मुलीच्या विनयभंगाचा आरोप करत तक्रार दाखल केली तर आयटी आयुक्तांच्या पतीने सर्व आरोप फेटाळले आहेत.
क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आयपीएस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “माझी 26 वर्षीय मुलगी अक्षता आणि 22 वर्षीय मुलगा आयुष हे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबी आणि चेन्नई संघांमधील आयपीएल सामना पाहण्यासाठी गेले होते. रात्री 9.40 वाजता ते गॅलरी (डायमंड बॉक्स) मधून सामना पाहत असताना, अचानक एका अज्ञात व्यक्तीने कोणतेही कारण नसताना माझ्या मुलीवर ओरडला, त्यांना धमकावले आणि माझ्या मुलांना त्रास दिला. त्याने अनुचित वर्तन करत माझ्या मुलीला अश्लील स्पर्श केला आणि अश्लील भाषा वापरली.
मेडिकल कॉलेज ते नवीन आयटीआय; अहिल्यानगरला मुख्यमंत्र्यांचे अनेक गिफ्ट
माझ्या मुलाने संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली आहे आणि आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. असं आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.