आधारकार्ड दुरुस्त करण्याची अंतिम तारीख सरकारने वाढवली; काय आहे नवी तारीख?

तुमच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे अपलोड करून तुम्ही ही दुरुस्ती करू शकता.

News Photo   2026 05 18T192749.967

भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे असे शासकीय (Adhar) कागदपत्र आहे. आधार कार्डाला आता ओळखपत्रदेखील म्हटले जाते. हे ओळखपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचण येऊ शकते.

अनेकदा आपण आधार कार्ड तयार करतो पण घाई-गडबडीत आपल्याकडून बऱ्याच चुका राहतात. त्यामुळे आपल्याला आधार कार्डवरील पत्ता, नाव, जन्मतारीख बदलावी लागते. आता याबाबतच सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

देशातील कापड उद्योगही अडचणीत; कापूस आयातीवर 11 टक्के शुल्क हटविण्याची सरकारकडे मागणी

सरकारने आधार कार्ड दुरुस्त करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता तुम्हाला 14 जून 2027 पर्यंत तुमच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ही दुरुस्ती तुम्हाला माय आधार या पोर्टलवकर करता येईल.

या नव्या निर्णयानुसार 14 जून 2027 पर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील चुकलेली जन्मतारीख, पत्ता यांच्यात सुधारणा करू शकता. UIDAI ने ही सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर मोफत असेल.

तुमच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे अपलोड करून तुम्ही ही दुरुस्ती करू शकता. माय आधारवरून तुम्ही ही दुरुस्ती केली तर तुम्हाला पैसे लागणार नाहीत.

follow us