Download App

Video: कोल्हापूरकर हळहळले; संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत बेचिराख

कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले. संपूर्ण कोल्हापूरकर हळहळले.

  • Written By: Last Updated:

Keshavrao Bhosale Theatre Fire : ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री दहाच्या दरम्यान आग लागली. आगीचे नेमकं कारण समजू शकलं नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन पथकाचे जवान कार्यरत झाले होते. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह हे वारसा हक्क स्थळातील आहे. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. अशा या नाट्यगृहाला रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान आग लागली. (Keshavrao Bhosale Theatre) अचानक लागलेल्या भीषण आगीत नाट्यगृह बेचिराख झालं. आजचं संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. त्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने नाट्यरसिकांसह तमाम कोल्हापूरकर हळहळले आहेत.

Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा; आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया

दुरुस्तीसाठी तात्काळ १० कोटींचा निधी

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारान झाली होती. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणं दुर्दैवी आहे. मात्र, या वास्तूच्या पुन:उभारणीसाठी तात्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

अशी पसरली आग

अनावश्यक ठिकाणी केलेलं वायरिंग, त्याच्यात देखभाल दुरुस्तीकडे केलेलं दुर्लक्ष यामुळं आग प्रथम मागील बाजूस म्हणजे कुस्ती मैदानाच्या मंचाजवळ असणाऱ्या वीज नियंत्रण असणाऱ्या खोलीमध्ये लागली. तेथे ठिणग्या पडल्या. बाजूला असणाऱ्या नाट्यगृहातील लाकडी मंचाला आग लागली. त्या आगीमुळे वातानुकूलित यंत्रणेचा स्फोट झाला. पाठोपाठ आग मुख्य नाट्यगृहामध्ये पसरली.

राज्यात आणखी एका पुतण्याचे बंड ! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघेंचा पुतणा काँग्रेसमध्ये

किंमत मोजावी लागली

नाट्यगृहामध्ये पूर्ण लाकडी गॅलरी, खुर्च्यांचे कुशन, सिलिंग, लाकडी साहित्य लगेच पेटलं. शाहू महाराजांचं वैभव पाहता पाहता संपुष्टात आले. या आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, नाट्यगृहामध्ये अनावश्यक बदल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे. दरम्यान, या ठिकाणी चाललेल्या चुकीच्या, बेकायदेशीर कामाबाबत आम्ही आवाज उठवत होतो. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं होते. त्याची किंमत आज अशाप्रकारे मोजावी लागली असं दुःखही त्यांनी व्यक्त केले आहे.

 

follow us