Kolhapur’s Sai Jadhav becomes first woman lieutenant of Territorial Army : एका मराठी मुलीने कोल्हापूर आणि कुटुंबाचा वारसा जपत तब्बल 93 वर्षांचा विक्रम मोडला आहे, इतिहास घडवला आहे. कोल्हापूरच्या सई जाधव यांनी प्रादेशिक सेनेच्या विशेष कोर्समधून भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये एकमेव महिला लेफ्टनंट बनल्या आहेत.
याबाबत त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अभिनंदन केले आहे. या पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले की, सई जाधव यांनी केवळ 23व्या वर्षी इंडियन मिलिट्री अकादमी (IMA), डेहराडून येथून पास-आउट होत भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून कमीशन मिळवले आणि 93 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अधिकारी बनण्याचा मान मिळवला.
1932 साली स्थापन झालेल्या IMA मधून आजवर हजारो अधिकारी घडले, मात्र प्रथमच एका महिलेला हे गौरवाचे स्टार्स खांद्यावर लावण्याचा मान मिळाला आणि तो मान एका मराठी मुलीला मिळाला, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नाही, तर देशातील असंख्य मुलींसाठी आत्मविश्वास, धैर्य आणि स्वप्नांची दिशा दाखवणारा प्रेरणादायी टप्पा आहे.
कुणाला अनुकूल लाभ तर कुणाला प्रतिकूल; जाणून घ्या मेषपासून मीनपर्यंत आजचा दिवस कसा राहणार?
सई जाधव या देशसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या जाधव कुटुंबातील चौथी पिढी ठरल्या आहेत, बेळगाव येथे शिक्षण आणि जडणघडण झालेल्या, मूळ कोल्हापूरच्या सई यांचे पणजोबा ब्रिटिश सेनेत, आजोबा भारतीय सैन्यात, वडील मेजर संदीप जाधव यांच्या सेवेच्या परंपरेला पुढे नेत सई यांनी सशस्त्र दलात नवा इतिहास घडवला आहे.
त्यांनी प्रादेशिक सेनेच्या विशेष कोर्स अंतर्गत आपलं कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. यातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा आणि एसएसबी मुलाखत दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी आयएमएच्या नियमित कोर्समध्ये नव्हे तर प्रादेशिक सेनेच्या विशेष प्रशिक्षण कोर्स अंतर्गत हे प्रशिक्षण घेतलं आणि 16 अधिकारी कॅडेट्समधून एकमेव महिला होत्या ज्या लेफ्टनंट बनल्य आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयाने गुटखा उत्पादकांना चपराक; आता मकोका अंतर्गत होणार कारवाई
त्यांच्या पासिंग आऊट सेरेमिनेच्यावेळी त्यांचे वडील मेजर संदीप जाधव यांनी त्यांच्या खांद्यावर लेफ्टनं चे स्टार लावले. ते देखील मेजर आहेत. तसेच त्यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यात कार्यरत होते. दरम्यान सई यांच्या भारतीय सेनेतील प्रवेशामुळे महिलांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या वेळी एक मोठी घोषणा करण्यात आली की, जून 2026 पासून सैन्याच्या महिला अधिकारी कॅडेट्स नियमितपणे पुरुष सोबत एएमएमध्ये प्रशिक्षण घेतील आणि पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होतील.
