कोल्हापूरच्या खेळाडूचा ऑलिम्पिकमध्ये धमाका, अचूक ‘लक्ष्य’ भेदून केला अंतिम फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे आज कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.

कोल्हापूरच्या खेळाडूचा ऑलिम्पिकमध्ये धमाका, अचूक 'लक्ष्य' भेदून केला अंतिम फेरीत प्रवेश

कोल्हापूरच्या खेळाडूचा ऑलिम्पिकमध्ये धमाका, अचूक 'लक्ष्य' भेदून केला अंतिम फेरीत प्रवेश

Paris Olympics 2024 : कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने ऑलिम्पिक जोरदार धमाका केलाय. (Paris Olympics)पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे आज नेमबाजीत पुरुषांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारातील क्वालिफायर्स पार पडले. या प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, त्यामुळे आता त्यानेही पदकांच्या आशा उंचावल्या आहेत.

Paris Olympics : मनू भाकरने रचला इतिहास! सरबज्योतसह जिंकलं दुसरं कांस्यपदक

क्वालिफायर्समध्ये स्वप्नील ७ व्या क्रमांकावर राहिला. याच प्रकारात भारताचा ऐश्वर्य प्राताप सिंग तोमर देखील सहभागी झाला होता. मात्र, त्याला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. क्वालिफायर्समधून केवळ ८ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

Exit mobile version