भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक

भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 Schedule on 29th July : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये काल रविवार मनू भाकरने भारताचं पदकांचं खातं खोललं आहे. आता आजही भारताच्या पदकांच्या खात्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (Paris Olympic ) आज भारताचे खेळाडू बॅडमिंटन, नेमबाजी, टेनिस, टेबल टेनिस, तिरंदाजी आणि हॉकी या क्रीडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, नेमबाजी आणि तिरंदाजीमध्ये भारताला पदकांच्या आशा असणार आहेत.

पॅरिसच्या डिओर फॉल-विंटर हाउतेमध्ये Sonam Kapoor जलवा; सर्वांना केले चकित

भारताचे नेमबाज अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल हे पदकासाठी निशाणा साधताना दिसतील. याशिवाय आज नेमबाजीत आणखी दोन क्वालिफायर्स होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारातही मनू भाकर सरबज्योतसह क्वालिफायर्स खेळताना दिसणार आहे. त्यांच्यासह अर्जून सिंग चिमा आणि रिदम सांगवान ही जोडीही या क्वालिफायर्समध्ये उतरणार आहे.

 क्वार्टरफायनल खेळणार

बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागची जोडी दुसऱ्या फेरीत आज खेळेल, लक्ष्य सेनही मैदानात उतरणार आहे. हॉकीमध्ये भारताचा सामना बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. याशिवाय तिरंदाजीत भारताचा संघ क्वार्टरफायनल खेळणार आहे. जर भारतीय संघाने क्वार्टरफायनल जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, तर भारतीय संघाला ऐतिहासिक पदक जिंकण्याचीही संधी असेल.

तिसऱ्या दिवसाचं वेळापत्रक

बॅडमिंटन

  • पुरुष दुहेरी (दुपारी १२ वाजता) (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी)
  • महिला दुहेरी (दुपारी १२.५० वाजल्यापासून) (अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो)
  • पुरुष एकेरी (संध्या. ५.३० वाजता) (लक्ष्य सेन)

नेमबाजी

  • १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक क्वालिफायर्स (दुपारी १२.४५ वाजता) (सरबज्योत सिंग-मनू भाकर आणि अर्जून सिंग – रिदम सांगवान)
  • महिला १० मीटर एअर रायफल फायनल (दुपारी १ वाजता) (रमिता जिंदाल) (पदकासाठी लढत)
  • पुरुष ट्रॅप क्वालिफायर्स (दुपारी १ वाजता) (पृथ्वीराज तोंडाईमन)
  • पुरुष १० मीटर एअर रायफल फायनल (दुपारी ३.३० वाजता) (अर्जुन बबुता)

टेनिस

  • पुरुष दुहेरी दुसरी फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून) (रोहन बोपण्णा – श्रीराम बालाजी)

हॉकी

  • भारत विरुद्ध अर्जेंटिना (दुपारी ४.१५ वाजता)

तिरंदाजी

  • पुरुष रिकर्व्ह सांघिक क्वार्टर-फायनल (संध्या. ६.३१ वाजता) (तरुणदीप राय, धिरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव)
  • पुरुष रिकर्व्ह सांघिक सेमीफायनल (संध्या. ७.१७ वाजल्यापासून) (जर पात्र ठरले तर)
  • पुरुष रिकर्व्ह सांघिक कांस्यपदकासाठी लढत (जर सेमीफायनल हरले तर) (रात्री ८.१८ वाजता)
  • पुरुष रिकर्व्ह सांघिक सुवर्णपदाकासाठी लढत (जर सेमीफायनल जिंकली तर) (रात्री ८.४१ वाजता)

टेबल टेनिस

  • महिला एकेरी राऊंड ऑफ ३२ (रात्री ११.३० वाजल्यापासून) (श्रीजा अकुला)

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube