मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. बारसू प्रकरणातील प्रश्न मांडण्यासाठी विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले की सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. सरकार हे लोकांना समजून का सांगत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री किंवा उद्योगमंत्री थेट लोकांना का भेटत नाही. त्यांना हा प्रकल्प फायद्याचा आहे, हे पटवून का देत नाही. फक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना समोर करून सरकार दडपशाही का करत आहे ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली
यावेळी बोलताना राऊत यांनी सांगितलं की आज देखील आंदोलक त्यांचे प्रश्न घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची यावर चर्चा देखील झाली. त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी देखील आज या मुद्द्यावर भाष्य केलं. कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, बारसु वरुन रान पेटवलं जातयं, उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं…. हो दिलं होतं, मी कुठे नाही म्हणतोय. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? बारसु बद्दलची, नाणार बद्दलची माझी भूमिका ही तेथील लोकांची भूमिका! असं उत्तर त्यांनी दिल.
राजकीय भूकंप! ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
मुख्यंमत्री असताना त्यांची दिल्लीतील लोक सतत फोन करत होते. चांगला प्रकल्प आहे, इतक्या लोकांना रोजगार मिळेल. असं सांगत होते. म्हणून मी प्राथमिक अहवाल घेतला. त्यातून बारसूची जागा समोर आली. पण हा सरकार जर लोकांच्या भल्याचा असेल तर त्यांना समजून का सांगत नाहीत, त्यांच्या डोक्यात का काठ्या घालाव्या लागत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला.
त्या प्रकल्पाबद्दल लोकांना समोर बसवून त्यांना समजून सांगावं, आम्ही लोकांना समोर बसवून समजून सांगणार होतो. तुम्ही देखील तसंच लोकांना समजून सांगा. पारदर्शक म्हणता ते पारदर्शकपणा दाखवून द्या. असं आव्हान देखील त्यांना दिल.