Download App

बेकायदेशीर मासेमारीचा प्रश्न विधिमंडळात गाजला! नितेश राणे-मुनंगटीवारांमध्ये जुगलबंदी…

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत कडक कायदा करण्याची मागणी केलीयं.

Image Credit: Letsupp

Nitesh Rane Speak On fishing : कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीचा प्रश्न थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजलायं. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एलईडी मासेमारी करणाऱ्यांबाबत सरकारने ठोस पाऊले उचलून कडक कायदा करण्याची मागणी केलीयं. आधुनिक मासेमारी केल्याने पारंपारिक मासेमाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा सूर नितेश राणे यांना आवळलायं. नितेश राणे यांनी मासेमाऱ्यांच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि नितेश राणे यांच्यात जुगलबंदी झाली असल्याचं दिसून आलंय.

मोदींची भेट, मुंबईत ओपन बसमधून सेलिब्रेशन; विश्वविजेत्या टीम इंडियाचं भारतातलं प्लॅनिंग ठरलं!

समुद्र किनापट्टीवर आता काही मासेमाऱ्यांकडून आधुनिक पद्धतीने मासेमारी केली जात आहे. आधुनिक मासेमारीमध्ये एलईडी पद्धतीने मासेमारी केली जात आहे. तर दुसरीकडे पारंपारिक पद्धतीनेही काही मासेमारी व्यवसाय करीत आहेत. यामध्ये श्रीमंत माणूस आधुनिक पद्धतीने मासेमारी करीत आहे. ही मासेमारी बेकायदेशीर असून यावर सरकारकडून आकारण्यात आलेला दंड भरुन ते पुन्हा मासेमारी करीत आहेत. त्यामुळे सरकारने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर दंड आकारुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक झाली पाहिजे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केलीयं.

तसेच या मासेमारीबाबत आम्ही अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तर अधिकाऱ्यांकडून आमच्यावरच कलम 353 नूसार कारवाई करण्यात येत आहे. आधुनिक मासेमारीमुळे पारंपारिक मासेमारीवर परिणाम होत असल्याने सरकारने यावर, अपेक्षित तोडगा काढावा, आम्ही मागील दहा वर्षांपासून विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करीत आहोत, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचंही आमदार राणे यांनी स्पष्ट केलंय.

Mrunmayee Deshpande: मराठी अभिनेत्रीने सुनील गावस्कर यांच्यासह अमेरिकेत घालवला वेळ, फोटो शेअर करत म्हणाली…

नितेश राणे यांनी लक्षवेधी मांडल्यानंतर मंत्री मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, आधुनिक मासेमारी करणाऱ्यांना सरकारकडून आकारण्यात आलेला 5 ते 6 लाख रुपये दंड भरणे हे परवडत आहे. एलईडी मासेमारी लोकं एकदा समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्यास जवळपास 10 लाख रुपयांचे मासे घेऊन येतात. त्यामुळे त्यांना दंड भरणं परवडत आहे. राणेंच्या लक्षवेधीनंतर किनारपट्टीवरील आमदारांची बैठक घेऊन आधुनिक मासेमाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, मासेमारीच्या लक्षवेधीवर आमदार जयंत पाटील यांनीही आवाज उठवला आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी समुद्रात गस्तीसाठी बोटी फिरत असतात. या बोटीमधून गस्त घालणारे अधिकारी आधुनिक मासेमारी करणाऱ्यासोबत समुद्रातच डील करीत असतात. त्यामुळे गस्तीसाठी फिरत असलेल्या बोटींमध्ये वाढ करुन या बोटींमध्ये पारंपारिक मासेमारी करणारा एक माणूस ठेवावा, यासोबतच बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अटक होऊन 2 वर्षे तुरुंगवास झाला पाहिजे, असा कायदा करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केलीयं.

follow us

वेब स्टोरीज