Mrunmayee Deshpande: मराठी अभिनेत्रीने सुनील गावस्कर यांच्यासह अमेरिकेत घालवला वेळ, फोटो शेअर करत म्हणाली…

Mrunmayee Deshpande: मराठी अभिनेत्रीने सुनील गावस्कर यांच्यासह अमेरिकेत घालवला वेळ, फोटो शेअर करत म्हणाली…

Mrunmayee Deshpande America Photo: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande). कमी काळात तिने जास्त लोकप्रियता मिळवली आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये मृण्मयी (Mrunmayee Deshpande) झळकली आहे. त्यामुळे तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. मृण्मयी सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. तिने एका कार्यक्रमानिमित्त अमेरिकेला गेल्याची माहिती समोर आली आहे.


तिच्याबरोबरच अभिनेत्री सायली संजीव देखील या कार्यक्रमाचा भाग होती. या ट्रीपमधील अनेक भन्नाट फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अमेरिकेत मृण्मयी आणि सायलीने खूप धमालमस्ती केल्याचं बघायला मिळाले आहे. सायली आणि मृण्मयी यांनी बरवा मेकअपच्या एका कार्यक्रमाला सोबतच हजेरी लावल्याचे दिसत आहे.

या ट्रीपमधील विशेष गोष्ट म्हणजे यावेळी दोघींनीही दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भेट घेतली आहे. अभिनेत्रीने आणि सायलीने त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत सुनील गावस्कर यांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, मृण्मयीचे अमेरिकेतील फोटो चर्चेत असून चाहते तिच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत असतात.

Mrunmayee Deshpande : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचं भुरळ पाडणारं सौंदर्य

अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात तिचं स्वत:चं असं एक अनोखं स्थान निर्माण केलं. अग्निहोत्र या गाजलेल्या सिरीयलने मृण्मयीला ओळख मिळवून दिली. या सिरियलमधून मृण्मयीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘कुंकू’ या सीरियलमध्ये ती दिसली होती. अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्येही मृण्मयीने काम केलं आहे. ‘मोकळा श्वास’, ‘भाई : व्यक्ती की वल्ली’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘साटं लोटं पण सगळं खोटं’, ‘संशय कल्लोळ’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ अशा सिनेमांमध्ये पाहायला मिळाली. ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘सुभेदार’ या सिनेमांमध्ये मृण्मयीने ऐतिहासिक भूमिका साकारल्या. आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेल्या मृण्मयीने बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज