फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रियाताई गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध…; नितेश राणेंचं विधान

फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रियाताई गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध…; नितेश राणेंचं विधान

Nitesh Rane on Supriya Sule : पुण्यातील बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांना चिरडल्याची घटना (Pune Porsche Accident)राज्यात चर्चेचा विषय झाली. पोलिसांनी मुलाला संरक्षण देत एफआयआर कमकुवत केल्याचा आरोप केला जात होता. त्यानतंर मुलाच्या वडिलांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Sanjay Dutt: अभिनेत्याने सोडला खिलाडीचा सिनेमा ‘वेलकम टू द जंगल’, यामागचं कारण आलं समोर 

देवेंद्र फडणवीसांचा कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला.

नितेश राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राणेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, पुणे अपघात प्रकरणी शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टींवर फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत, ते आम्हाला सांगावा. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील, असं राणे म्हणाले.

मोठी बातमी : बॉयलरच्या स्फोटांनी डोंबिवली हादरली; बचावकार्य सुरू, पाहा व्हिडिओ 

गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते, असे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले, हा शिंदे आणि शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. कीर्तीकर यांनी पक्षाचा राजधर्म पाळला पाहिजे. जर पितृ प्रेम असते तर मुलाने गद्दारी केली नसती, असं म्हणत राणेंनी अमोल कीर्तिकरांवर टीका केली.

बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केले
राज्यातील पाचही टप्प्यांतील मतदान संपलले आहे. मात्र, मतदानाच्या टक्यांवरून विरोधकांकडून आरोप केले जात आहे. यावरून नितेश राणेंनी पटवार केला. ते म्हणाले, हे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत. आपला पराभव होणार हे माहीत असल्याने ते निवडणूक आयोगाला बळीचा बकरा बनवत आहेत. आशिष शेलार यांची तक्रार योग्य आहे. पराभव समोर दिसू लागल्याने उद्धव ठाकरे हे शेमड्यासारखे रडत आहेत, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज