Ajit Pawar Rajkot Fort Visit : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात (Rajkot Fort) आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली आहे. यानंतर या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनीही माफी मागितली होती. यानंतर अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
मोठी बातमी! राजकोट किल्लाप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चेतन पाटील ताब्यात
अजित पवार म्हणाले हा पुतळा नौदलानं केला की सार्वजनिक बांधकाम विभागाने यात वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी पोलिसांनी चेतन पाटीलला अटक केली आहे. मात्र शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे असे विचारले असता अजित पवार म्हणाले, तो पळून पळून जाणार कुठं, देश सोडून तर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधून काढू. पुतळा उभारताना काय घडलं याची माहिती त्याच्याकडून घेतली जाईल.
प्रत्येकानं आपापलं तारतम्य राखलं पाहिजे. राज्याची संस्कृती जपली पाहिजे. पुतळा उभारण्याचं काम देण्याआधी संबंधि शिल्पकाराचा संपूर्ण इतिहास, त्याचा अनुभव या गोष्टी लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल. शिल्पकाराचा अनुभवही लक्षात घेतला जाईल. पुतळा उभारण्यासाठी जितका वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ देऊन काम केले जाईल असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
“मी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो” अजितदादांनी भर सभेत मागितली माफी
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यात जनसन्मान यात्रा काढली जात आहे. काही दिवसांपूर्वी ही यात्रा लातूर शहरात आली होती. यावेळी आयोजित सभेत अजित पवार यांनी या घटनेबद्दल राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली होती. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत. त्यांचा पुतळा वर्षभराच्या आत कोसळणं धक्कादायक आहे, असे अजित पवार म्हणाले होते.