Deepak Kesarkar On Ratnagiri-Sindhudurg : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्खीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपकडून केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) तर शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. किरण सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर नारायण राणेंनी थेट प्रचाराला सुरूवात केली. त्यामुळं या जागेचा तिढा वाढला आहे. अशातच आता अशातच शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणेंना मतदान करा, असं आवाहन केलं.
“अलबत्या गलबत्या” लवकरच थ्रीडीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला, टीझरला सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर भाजप आणि शिवसेना यांच्यात अजूनही रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केसरकर यांनी सिंधुदुर्गातील मतदारांना केले आहे. त्यामुळे नारायण राणे हे संभाव्य उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राजकारण करताना व्हिडिओ नव्हे, कर्तृत्व दाखवावे लागते; खा. विखेंचा विरोधकांना टोला
राऊत राज्यमंत्रीही झाले नाही
केसरकर यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. विद्यमान खासदार येथून दोनवेळा निवडून आले, पण ते साधे राज्यमंत्रीही होऊ शकले नाहीत. त्यामुळे नारायण राणे यांना निवडून आणून मोदी मंत्रिमंडळात पाठवा, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
अजूनही रस्सीखेच सुरू
काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. मात्र, नंतर त्यांनी ती पोस्ट हटवली होती. महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीबाबत किरण सामंत ठाम आहेत. त्यामुळं या जागेवर भाजप आणि शिवसेना यांच्यात अजूनही रस्सीखेच सुरू आहे. त्यांनी तिकिटासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले होते. यानंतर किरण सामंत यांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे रत्नागिरी – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढला आहे. आता दोन्ही इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले असल्याने उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे