राजकारण करताना व्हिडिओ नव्हे, कर्तृत्व दाखवावे लागते; खा. विखेंचा विरोधकांना टोला

राजकारण करताना व्हिडिओ नव्हे, कर्तृत्व दाखवावे लागते; खा. विखेंचा विरोधकांना टोला

अहमदनगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात लढत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आताही त्यांनी निलेश लंकेवर निशाणा साधला.

Sangli Lok Sabha : …तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; चंद्रहार पाटलांचे मोठे विधान 

राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे लागते, त्याग करावा लागतो. केवळ व्हिडीओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला सुजय विखेंनी लगावला.

शेवगाव तालुक्यातील घोटण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा. डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विखे आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जावून करा. कोण काय बोलतो कोणते व्हिडीओ टाकतो यावर राजकारण होत नाही. राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते. त्याग लागतो. इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणारा आहे.. तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळेच जिल्ह्यातील जनता वर्षानुर्षे साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Michael Slater News : ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू पुन्हा वादात, घरगुती अत्याचारासह 19 गुन्हे दाखल 

पुढं ते म्हणाले, राज्यात दीड वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार आले. प्रत्येक गावात विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. हे सरकार पाच वर्षांसाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती. पण, सरकार का आले नाही, हे सर्वांना माहीत आहे. पण, आता महायुतीचं सरकार तेवढ्याच गतीने निर्णय घेत असून कामं मार्गी लागत आहे, असं विखेंनी सांगितलं.

विखे म्हणाले, ही लोकसभा निवडणुक देशाचे भविष्य घडवणारी आहे. देशाला प्रगती पथावर नेतांनाच देश सुरक्षित कसा राहील याचे धोरण ठरवणारी निवडणूक असल्यानं निवडणुकीपकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करून राजकारण प्रेमाने कमावलेल्या लोकांना बरोबर घेऊन करायचं असते, असंही विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube