उद्धव ठाकरे यांना आता बारसूचा खांदा मिळाला असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच रान पेटल्याचं दिसतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
Video : ‘लोक माझे सांगाती’ च्या दुसऱ्या आवृत्तीत आहे तरी काय?
उपमुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे. आधी स्वत:च पत्र लिहायचे आणि रिफायनरी बारसूला करा, असं सांगायचं, नंतर स्वत:च चिथावणीखोर कृती करायची. यातून उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा पुढे आला असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंना समाजाशी, विकासाशी काही एक लेनदेन नाही. विविध खांदे ते शोधतच असतात. आता बारसूचा खांदा त्यांना मिळाला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Maharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल लागणार? 8 ते 12 मे शिंदे-फडणवीसांसाठी महत्त्वाचे
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन भूमिपूत्रांचं आंदोलन सुरु होतं. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर मी बारसूत जाऊन नागरिकांची भेट घेणार असल्याचंही ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्यात सध्या बारसूमध्ये आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांकडून होतं असून तरीदेखील स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही या आंदोलनात सहभागी झाले होते.